राष्ट्रीय समाज पक्षाने केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई करण्याची मागणी
नायब तहसीलदारांना दिले निवेदन
राष्ट्रीय समाज पक्षाने केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई करण्याची मागणी
नायब तहसीलदारांना दिले निवेदन
बारामती वार्तापत्र
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून त्याचे प्रशासकीय यंञणे मार्फत पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी .
आज दि.16 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देऊन केली, त्यावेळी अँड.अमोल सातकर यांनी सांगीतले की शेतातील हाताला आलेली पिके मका असेल किंवा सोयाबीन काढून पडले होते.शेतातील उभी पिके वाहुन गेली, त्यामुळे शेतकरी पुर्ण पणे मोडखळीस आलेला आहे त्याचा परंपंच उध्वस्त झालेला आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर , काकासाहेब बुरूंगले, चंद्रकांत वाघमोडे,किशोर सातकर,निखील दांगडे,भुषण सातकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.