शैक्षणिक

रिक्षा आणि स्कूल व्हॅन चालकांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा; ‘हे’ महत्त्वाचे नियम

कोणतीही दुर्लक्ष किंवा नियमभंग खपवून घेतला जाणार नाही,

रिक्षा आणि स्कूल व्हॅन चालकांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा; ‘हे’ महत्त्वाचे नियम

कोणतीही दुर्लक्ष किंवा नियमभंग खपवून घेतला जाणार नाही,

पुणे;प्रतिनिधि

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि स्कूल व्हॅन चालकांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा दिला आहे. “मुलांची सुरक्षित वाहतूक ही सामूहिक जबाबदारी असून, कोणतीही दुर्लक्ष किंवा नियमभंग खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

महत्त्वाचे नियम व बंधने:

  • प्रत्येक स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक.
  • वाहतुकीदरम्यान महिला सहाय्यकाची उपस्थिती अनिवार्य.
  • रिक्षामधून एका वेळी पाचपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेण्यास मनाई.
  • चालक आणि सहाय्यकांची चारित्र्य पडताळणी तसेच वैद्यकीय तपासणी आवश्यक.
  • सर्व वाहने नियमित फिटनेस तपासणी उत्तीर्ण केलेली असावी.

ही माहिती जिल्हा शालेय वाहतूक सुरक्षा समितीच्या बैठकीत देण्यात आली, जी बुधवारी (११ जून) पुणे पोलिस आयुक्तालयात पार पडली. या बैठकीस पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, स्वप्नील भोसले (पुणे), संदेश चव्हाण (पिंपरी-चिंचवड) आणि सुरेंद्र निकम (बारामती) उपस्थित होते.

कठोर कारवाईचा इशारा:

“शाळेच्या वाहनांनी ठरवलेली मानके आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जे चालक किंवा संस्था याकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील शाळांनी आणि वाहन चालकांनी या सूचनांचे तातडीने पालन करावे, अन्यथा परवाने रद्द करणे, दंड आकारणे आणि अन्य दंडात्मक उपाय यांची अंमलबजावणी केली जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

Related Articles

Back to top button