रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा ! पाकीट युवकास केले परत
प्रवासी युवकाने मानले आभार
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर येथील रिक्षा चालकाने प्रवाशाचे रिक्षात नजरचुकीने राहिलेले महत्वाची कागदपत्रे असणारे पैशाचे पाकीट परत करत प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे.
लोणी देवकर औद्योगिक वसाहतीत कामावर असणाऱ्या आनंद गायकवाड या प्रवाशांने शनिवारी (दि.८) रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इंदापूर बस स्थानकापासून टेंभुर्णी नाका इथं पर्यंत रिक्षा चालक संतोष सोनटक्के यांच्या रिक्षातून प्रवास केला होता.यावेळी प्रवासी गायकवाड यांनी रिक्षा चालकास फोन पे वरून प्रवाशी भाडे दिले होते.त्याच दरम्यान प्रवासी गायकवाड यांच्याकडून सदरील रिक्षात महत्वाची कागदपत्रे असणारे पैशाचे पाकीट नजरचुकीने राहिले होते.दरम्यान ही बाब रिक्षा मालक संतोष सोनटक्के यांच्या लक्षात येताच त्यांनी फोन पे केलेल्या नंबरवर संपर्क करून सदरील व्यक्तीला त्यांचे पाकीट माघारी केले.त्यामुळे प्रवाशी युवकाने रिक्षा चालक संतोष सोनटक्के यांचे आभार मानले.