स्थानिक

रुग्णवाहिका की मृत्यूवाहिका? बारामतीत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

टॅक्सबारा३१\१२\२०२५,फिटनेस. ६/१/२०२६, इन्शुरन्स. २१/११/२०२५

रुग्णवाहिका की मृत्यूवाहिका? बारामतीत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह

टॅक्सबारा३१\१२\२०२५,फिटनेस. ६/१/२०२६, इन्शुरन्स. २१/११/२०२५

बारामती वार्तापत्र

बारामती येथे नियमांचे उल्लंघन करत एक ॲम्बुलन्स वाहन सर्रास रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित वाहनाचे टॅक्स, इन्शुरन्स आणि पासिंगची मुदत संपलेली असतानाही ते वाहन विनाअडथळा रुग्णांची वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे वाहन ॲम्बुलन्स म्हणून नोंदणीकृत असल्यामुळे त्याच्या कागदपत्रांची तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. आरटीओकडून नियमित तपासणी होत नसल्याचा फायदा घेत संबंधित वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे सांगितले जाते.

वाहनाचे इन्शुरन्स व फिटनेस प्रमाणपत्र नसताना रुग्णांची वाहतूक करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अपघात झाल्यास रुग्णांच्या तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित ॲम्बुलन्ससह इतर सर्व खासगी व व्यावसायिक वाहनांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनांवर कठोरात कठोर कारवाई करून दंडात्मक तसेच कायदेशीर पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल.

दरम्यान, बारामतीतील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) ने या प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि नागरिकांच्या जीवितास प्राधान्य देत तत्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे हीच खरी लोकसेवा असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Back to top button