स्थानिक

रुग्ण सेवा हीच ईशवर सेवा : हनुमंत निंबाळकर

माजी सैनिकांच्या हस्ते हॉस्पिटल चा शुभारंभ व देश सेवेचे दर्शन

रुग्ण सेवा हीच ईशवर सेवा : हनुमंत निंबाळकर

माजी सैनिकांच्या हस्ते हॉस्पिटल चा शुभारंभ व देश सेवेचे दर्शन

बारामती वार्तापत्र

रुग्णांना कमी वेळेत बरे करताना गुणवत्ता व दर्जात्मक सेवा देत सामाजिक बांधीलकी जोपासणे महत्वाचे असून रुग्ण सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेचे बारामती तालुका अध्यक्ष हनुमंत निंबाळकर यांनी प्रतिपादन केले
जळोची येथील डॉ संतोष शिंदे यांच्या साई निर्मिती हॉस्पिटल व मेडिकल स्टोअर चा शुभारंभ बारामती तालुक्यातील सर्व माजी सैनिक व जय जवान आजी माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्तीताना हनुमंत निंबाळकर मार्गदर्शन करीत होते.

या प्रसंगी जम्मू काश्मीर सीमेवर कार्यरत असणारे हरिदास नाळे व मा. सैनिक रमेश रणमोडे ,बाळासाहेब तावरे, गणपत फडतरे ,बळवंत वाघमारे, शशिकांत शिंदे, विजय भापकर, राजीव सस्ते, सचिन चव्हाण, अण्णा जमदाडे ,महादेव मलगुंडे, प्रकाश देवकाते व राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे,मा. नगरसेवक अतुल बालगुडे, शैलेश बगाडे,श्रीमती संगीता सातव, मा. पं. समिती गटनेते दीपक मलगुंडे,मा. सरपंच दत्तात्रय माने,रा. स. प अध्यक्ष ऍड अमोल सातकर, व श्रीरंग जमदाडे, निखिल होले,डॉ संदीप शहा, प्रमोद ढवाण,प्रा मनोहर जमदाडे,तुषार पांढरे, विनोद चव्हाण, मयूर सातव, मच्छिंद्र जमदाडे व इतर मान्यवर उपस्तीत होते.

राजकीय किंवा अभिनय क्षेत्रातील व्यक्तीच्या हस्ते उदघाटन न करता माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्या हस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ करणे आदर्शवत असल्याचे प्रताप पागळे व इतर मान्यवरांनी सांगितले.

रुग्णांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा व सुविधा उपलब्ध असून माजी सैनिकांच्या हस्ते शुभारंभ करणे म्हणजे देश सेवा आहे व माजी सैनिकांना ५०% सवलत देणार असल्याचे डॉ संतोष शिंदे व डॉ गीतांजली शिंदे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार प्रदर्शन धनंजय जमदाडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!