“रुपाली चाकणकरांची वकिली बंद करा; अवकाळी संकटावर लक्ष द्या” – शिरूरच्या शेतकरी पुत्राचा कृषिमंत्र्यांना थेट जाब
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.”

“रुपाली चाकणकरांची वकिली बंद करा; अवकाळी संकटावर लक्ष द्या” – शिरूरच्या शेतकरी पुत्राचा कृषिमंत्र्यांना थेट जाब
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.”
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना, शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत संबंधित तरुणाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकरी पुत्राने कृषिमंत्री भरणे यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मात्र, त्यांचा कॉल मंत्र्यांच्या खासगी सहाय्यकाने (पीए) उचलला. “मला थेट कृषिमंत्र्यांशी बोलायचे आहे,” अशी विनंती त्यांनी केली असता, “आपला संदेश आम्ही नक्की पोहोचवू,” असे उत्तर पीएकडून देण्यात आले.
यावेळी संबंधित तरुणाने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. “रुपाली चाकणकर यांची वकिली बंद करा आणि राज्यात आलेल्या अवकाळी संकटाकडे लक्ष द्या,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे म्हटले की, “चाकणकर यांनी स्वतःच्या भाषणात काही व्यक्तींमुळे आपण या पदावर आहोत, असे मान्य केले आहे. मग अशा वेळी त्यांची बाजू घेण्याची गरज काय? सध्या महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे मोठे संकट आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत.”
तसेच, “जे काही सुरू आहे ते तपासाचा भाग आहे. आपण कृषिमंत्री आहात, अशा प्रकरणांमध्ये गुंतून आपली प्रतिमा खराब करून घेऊ नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे शेतकरी वर्गातील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि शासनाकडून अपेक्षित मदत यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासन नेमके काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






