रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी
रेखा जरे हत्या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. त्यांची हत्या कारला कट मारल्याच्या कारणावरून झाल्याचे सुरुवातीला
रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी
रेखा जरे हत्या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. त्यांची हत्या कारला कट मारल्याच्या कारणावरून झाल्याचे सुरुवातीला
बारामती वार्तापत्र
नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांमध्ये दोन कोल्हार येथील; तर एक केडगाव येथील आरोपी आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना; तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, गाडीला कट मारल्याचा कारणावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जरे यांची हत्या ही सुपारी देऊनच केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.