आमचं काय चुकलं!बारामतीमधील व्यापाऱ्यांचे आर्त हाक
बारामतीमधील व्यापाऱ्यांची सर्व दुकाने चालू करण्याची मागणी

आमचं काय चुकलं!बारामतीमधील व्यापाऱ्यांचे आर्त हाक
बारामतीमधील व्यापाऱ्यांची सर्व दुकाने चालू करण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
बारामतीतील पॉझिटिव्हिटीचा दर हा पाच टक्क्यांहून कमी असल्याने बारामतीत देखील पुण्याप्रमाणेच नियम लावावा अशी मागणी बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी केली आहे.
पुणे शहरातील निर्बंध हटविल्यानंतर आता बारामतीतील व्यापाऱ्यांनीही बारामतीतील निर्बंध हटवून सर्व दिवस सर्व दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे.
श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे पुढील चार महिने व्यापार्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, या पार्श्वभूमीवर आता लॉकडाऊन नको, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान याबाबत अजित पवार यांना निवेदन देणार असल्याची माहिती नरेंद्र गुजराथी यांनी दिली.
पुण्यामध्ये आज अजित पवार यांनी सर्व दिवस सर्व दुकाने सुरू राहतील ही घोषणा केल्यानंतर आता बारामतीतील व्यापाऱ्यांनी शनिवार रविवार चा लॉक डाऊन बंद करून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मागणी केली आहे.
व्यापाऱ्यांनी प्रत्येक लॉकडाऊनच्या वेळेस प्रशासनास सहकार्य केले आहे, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने, शनिवार-रविवार लॉकडाऊन देखील बंद करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दुकानांची वेळ दुपारी चार ऐवजी रात्री आठ वाजेपर्यंत करावी अशीही त्यांची मागणी आहे.