रेशकार्ड धारकांसाठी मे २०२१ चे धान्यवाटप सुरु.— तहसिलदार श्री. विजय पाटिल
सर्व ऑनलाईन असलेल्या शिधापत्रिकाधारकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रसार लक्षात घेता स्वस्त धान्य दुकानात धान्य घेते वेळेस सोशल डिस्टसिंग ठेवून , सॅनिटायझरचा वापर करून वेळेत धान्य घेवून जावे

रेशकार्ड धारकांसाठी मे २०२१ चे धान्यवाटप सुरु.— तहसिलदार श्री. विजय पाटिल
सर्व ऑनलाईन असलेल्या शिधापत्रिकाधारकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रसार लक्षात घेता स्वस्त धान्य दुकानात धान्य घेते वेळेस सोशल डिस्टसिंग ठेवून , सॅनिटायझरचा वापर करून वेळेत धान्य घेवून जावे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या 220 असून ऑनलाईनला एकूण 85695 शिधापत्रिका आहेत. त्यापैकी अंत्योदय शिधापत्रिका 7832 आहे. यामध्ये प्राधान्य कुटूंबाचे लाभार्थी 337110 व अंत्योदय लाभार्थी संख्या 31909 असे एकूण 369019 लाभार्थी आहेत. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत बारामती तालुक्यात माहे मे – 2021 करीता प्राप्त नियतन व धान्य वाटप खालीलप्रमाणे करणेत येणार आहे.
मा. राज्य शासनाकडून अंत्योदय 7832 शिधापत्रिकेचे 31909 लाभार्थ्यांकरीता गहू 1958 क्विंटल व तांदूळ 783.20 क्विंटल, अंत्योदय शिधापत्रिकेसाठी गहू 25 किलो, तांदूळ 10 किलो मोफत तसेच अन्नसुरक्षा योजनेंतर्गत 77863 शिधापत्रिकेचे 337110 लाभार्थ्यांकरीता गहू 10113.30 क्विंटल,तांदूळ 6742.20 क्विंटल प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मोफत असे धान्य वाटप करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय 7832 शिधापत्रिकेचे 31909 लाभार्थ्यांकरीता गहू 957.27 क्विंटल व तांदूळ 638.18 क्विंटल प्रती व्यक्ती गहू 3 किलो, तांदूळ 2 किलो मोफत तसेच अन्नसुरक्षा 77863 शिधापत्रिकेचे 337110 लाभार्थ्यांकरीता गहू 10113.30 क्विंटल,तांदूळ 6742.20 क्विंटल प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मोफत असे धान्य वाटप करण्यात येणार आहे. असे एकूण 23141.87 क्विंटल गहू व 14905.78 क्विंटल तांदूळ शिधापत्रिकाधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
तरी सर्व ऑनलाईन असलेल्या शिधापत्रिकाधारकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रसार लक्षात घेता स्वस्त धान्य दुकानात धान्य घेते वेळेस सोशल डिस्टसिंग ठेवून , सॅनिटायझरचा वापर करून वेळेत धान्य घेवून जावे असे, आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.