रेशनचा गहू काळ्याबाजारात विकणाऱ्यावर इंदापूर पोलिसांची कारवाई..
४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेशनचा गहू काळ्याबाजारात विकणाऱ्यावर इंदापूर पोलिसांची कारवाई..
४ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या तिघांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या तिघांकडून तीन टन धान्यासह बोलेरो जीप जप्त केली आहे
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात मयुर अशोक चिखले, अतुल सोमनाथ होनराव आणि वत्सला भानुदास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले की, इंदापूर मार्केटमध्ये विक्रीस आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली.
वाहनात असलेल्या गव्हाच्या 62 गोण्यांबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पंचनामा करण्यात आला त्या दुकानातील हा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंदापूर पोलिसांनी तीन टन गव्हासह साधारण 4 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.