रोटरी क्लब च्या वतीने बारामतीत सॅनिटायझर व मास्क चे वाटप
खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
रोटरी क्लब च्या वतीने बारामतीत सॅनिटायझर व मास्क चे वाटप
खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
बारामती वार्तापत्र
बारामतीचे सुपुत्र आणि देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या वतीने, बारामती बस स्थानकातील चालक, वाहक व इतर कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटायझर तसेच बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सॅनीटायझर चे स्टॅन्ड देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
हया वेळी १५० मास्क, १५ सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझर आगार प्रमुख मा. श्री गोंजारी साहेब हयाचे कडे सुपूर्त करण्यात आले. हया वेळी रोटरी क्लब ऑफ बारामती चे अध्यक्ष श्री हणमंतराव पाटील उपअध्यक्ष महावीर शहा सचिव विजय इंगळे, प्रतिक दोशी, स्वप्निल मुथा, मल्लिकार्जुन हिरेमठ ,दत्ताञय बोराडे, पार्श्वेंद्र फरसोले, अजित उलगडे, सौ.सुप्रिया बर्गे हे सर्वजण उपस्थित होते.