स्थानिक

रोमांचक लढतीत “रोहितदादा चषक” क्रिकेटचे सामन्यांचे मानकरी जय मल्हार क्रिकेट क्लब संघ ठरला

या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 63 संघाने सहभाग नोंदवला होता.

रोमांचक लढतीत “रोहितदादा चषक” क्रिकेटचे सामन्यांचे मानकरी जय मल्हार क्रिकेट क्लब संघ ठरला

या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 63 संघाने सहभाग नोंदवला होता.

बारामती वार्तापत्र

श्रद्धाच स्पेशल चायनीज चे रमेश वाईकर व पप्पूशेठ वाईकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोहितदादा चषक,हाफ पीच क्रिकेट सामन्यांचा अंतिम सामना जय मल्हार क्रिकेट क्लब व एस. डब्ल्यू क्रिकेट संघ गुणवडी यांच्यात खेळविण्यात आला होता.एस डब्ल्यू क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करतांना ५ ओव्हर मध्ये ५७ धावा केल्या होत्या त्याचा पाठलाग करतांना जय मल्हार क्रिकेट क्लब संघाने ५ विकेट राखून सामना जिंकला.हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेळण्यात आला अतिशय अटीतटीच्या सामन्यात रोमांचक विजयाची नोंद शेवटच्या चेंडूवर जल्हार मल्हार संघाने केल्याने प्रेक्षकांनी जल्लोष केला.

त्यामध्ये विजेतेपद जय मल्हार क्रिकेट क्लब यांना मिळाले.जय मल्हार क्लब संघाचे कर्णधार सूरज सुपलकर यांनी विजेतेपद पटकवल्या नंतर सांघिक खेळामुळे यश मिळाल्याचे सांगितले.

या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 63 संघाने सहभाग नोंदवला होता.
या सामन्यांचे उद्घाटन पारनेरचे आमदार निलेश लंके,तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील व बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले होते.
दरम्यान मैदानावर आमदार रोहितदादा पवार यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडू व आयोजकांचे मनोबल वाढवले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विजेत्या संघांना सन्मान चषक छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,गुनवडी गावचे सरपंच सतपाल गावडे यांच्या हस्ते देण्यात आले.

मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार सोनू बिरदवडे यांना तर मॅन ऑफ द मॅच सुरज सुपलकर यांना देण्यात आला.
दुसरे बक्षीस एस.डब्ल्यू.क्रिकेट संघ 30 फाटा,गुनवडी कर्णधार सोनू वाईकर यांना मिळाले तर तिसरे बक्षीस बुद्धवाशी पप्पू चव्हाण बारामती क्रिकेट क्लब कर्णधार विकास भोसले यांना मिळाले.

क्रिकेट सामन्याचे नियोजन नाथा जाधव,रुपेश खटके,भैय्या फाळके,किरण सुपलकर,श्रीकांत पवार,राहुल शिंदे,अक्षय बोरकर,सुरज बिरदवडे,सोमनाथ सुपलकर,अक्षय फाळके,अक्षय वायकर,कांता गंगावणे,सचिन शिंदे,नितीन भोसले आदींनी केले.

अंतिम सामना प्रसंगी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव पाटील, गुणवडी गावचे सरपंच सतपाल गावडे,बारामती तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे, सोशल मीडिया चे उपाध्यक्ष पैगंबर शेख,मा.उपसरपंच नामदेव लाड,वस्ताद पप्पू फाळके,यशपाल गावडे, सचिन पवार,अमोल पवार, बाळू फाळके, बंटी शिंदे,नंदकुमार बाबर आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button