रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळांना क्रीडा साहित्य मंजूर.
मुलांच्यामध्ये खेळा विषयी आवड निर्माण होवून बौध्दीक गुणवत्ते सोबत शारीरिक गुणवत्ता वाढीस मदत होणार

रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून प्राथमिक शाळांना क्रीडा साहित्य मंजूर.
मुलांच्यामध्ये खेळा विषयी आवड निर्माण होवून बौध्दीक गुणवत्ते सोबत शारीरिक गुणवत्ता वाढीस मदत होणार
माळेगाव ;-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माळेगाव कॉलनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी तावरे यांच्या हस्ते व रविराज तावरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कल्याण पाचांगे, मुख्याध्यापक बाळासो जगताप सर व शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.रोहिणी रविराज तावरे (लाखे)यांच्या प्रयत्नातून माळेगाव पणदरे जिल्हा परिषद गटातील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना क्रीडा साहित्य मंजूर करण्यात आले आहे. या अंतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, थाळीफेक,लगोरी,लेझिम,खोखो,डबल बार, गोळा फेक,दोरी उड्या,मल्लखांब,बँड या मैदानी खेळाबरोबर कॅरम,लुडो, बुद्धीबळ,योगा म्याट अशा अनेक बैठ्याखेळाचे साहित्य व वजन काटा, उंची मापक या सारख्या अनेक सुविधा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे मुलांच्यामध्ये खेळा विषयी आवड निर्माण होवून बौध्दीक गुणवत्ते सोबत शारीरिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.