रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त झालेल्या काही लोकांना तात्काळ उपचार मिळाले आहेत.
रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त झालेल्या काही लोकांना तात्काळ उपचार मिळाले आहेत.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त झालेल्या काही लोकांना तात्काळ उपचार मिळाले आहेत. अपघात झाल्यामुळे रस्त्याच्याकडेला खड्ड्यात गेलेली ओमनी कार रोहित पवार यांच्या नजरेस पडली. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून खड्ड्यात गेलेल्या या ओमनी कारला धक्का मारत बाहेर काढण्यास मदत केली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली.
त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळाले. रोहित पवार हे माण तालुक्यातील मांडवे-पिंगळी येथेून जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला एका शेतकऱ्याच्या ओमनी कारला अपघात झाल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही ओमनी कार खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली.
ओमनी कार बाहेर काढल्यानंतर त्यांनी तात्काळ अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळू शकले.
रोहित पवार यांनी त्यानंतर ट्विट करून या अपघाताची माहिती देतानाच अशा अपघाताच्या प्रसंगी मदत करण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचं आवाहनही केलं आहे. पोलीस चौकशीला घाबरून अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये, असं ट्विट पवार यांनी केलं आहे.
पोलिस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो.
त्यामुळं माझं आवाहन आहे, कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंती आहे, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये.
संबंधित बातम्या:
राजकारणात चहा विकल्याचंही भांडवल केलं जातं; रोहित पवारांचा खोचक टोला पाडव्याला मंदिरं पुन्हा खुली, रोहित पवार ग्रामदैवत गोदड महाराजांच्या दर्शनाला बिहारमध्ये नितीश कुमारांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झाले: रोहित पवार