रोहित पवार म्हणतात, आदरणीय अजितदादा आपण ‘हे’ करू शकता
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना एका फेसबूक पोस्टच्या माध्यमाधून सल्ला वजा विनंती केली आहे.
रोहित पवार म्हणतात, आदरणीय अजितदादा आपण ‘हे’ करू शकता
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना एका फेसबूक पोस्टच्या माध्यमाधून सल्ला वजा विनंती केली आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
केंद्र सरकारने जीएसटी भरपाईसाठी राज्यांना दिलेले दोन्ही पर्याय हे राज्यांना आर्थिकदृष्ट्या डबघाईत टाकणारे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना एका फेसबूक पोस्टच्या माध्यमाधून सल्ला वजा विनंती केली आहे.
जवळपास १५१८० कोटी रुपयांची ही रक्कम राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या साडेतीन टक्के एवढी आहे.
केंद्र सरकारने जीएसटी भरपाईसाठी राज्यांना दिलेले दोन्ही पर्याय हे राज्यांना आर्थिकदृष्ट्या डबघाईत टाकणारे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना एका फेसबूक पोस्टच्या माध्यमाधून सल्ला वजा विनंती केली आहे.
नेमकी काय आहे रोहित पवारांची पोस्ट
केंद्र सरकारने जीएसटी भरपाईसाठी राज्यांना दिलेले दोन्ही पर्याय हे राज्यांना आर्थिकदृष्ट्या डबघाईत टाकणारे आहेत. ९७००० कोटी रुपयांचा पहिला पर्याय राज्यांनी स्वीकारला तर हक्काच्या २.३५ लाख कोटी रुपयांपैकी १.३८ लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागेल तर २.३५ लाख कोटी रुपयांचा दुसरा पर्याय स्वीकारला तर कर्जावरील व्याज भरूनच राज्यांची दमछाक होणार आहे. केंद्र सरकारने दिलेले हे दोन्ही पर्याय राज्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळं हे पर्याय राज्यांच्या गळी उतरवण्याचा कितीही प्रयत्न केंद्र सरकारने केला तरी राज्यांनी त्याला बळी पडता कामा नये. खरंतर लोकांचा विचार करणारं आणि दिलेला शब्द पाळायचा हे माहीत असणारं सरकार केंद्रात असतं तर त्यांनी पर्याय न देता जो फरक आहे तो दिलेल्या शब्दाप्रमाणे रितसर प्रत्येक राज्याला दिला असता. पण तसं घडत नाही.