लग्न सोहळ्यात वधू-वरांनी घेतली मतदानाची शपथ
मतदानाचा टक्का वाढावा
बारामती वार्तापत्र
शहरातील ओमसाई लॉन्स कार्यालयात आयोजित वाघमोडे आणि बोरकर परिवाराच्या लग्न सोहळ्यात वर सुरज आणि वधू नंदिनी यांच्यासह उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी मतदान करण्याबाबत शपथ घेतली.
नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आवूर्जन मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी स्वीप समन्वयक सविता खारतोडे यांनी शपथ दिली. यावेळी स्वीपचे सदस्य रमेश चव्हाण आणि नवनाथ गायकवाड उपस्थित होते.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक पात्र मतदारांनी उत्सर्फूतपणे सहभागी व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा याकरीता प्रशासनाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, सायकल फेरी, पथनाट्ये आदी उपक्रम राबवून मतदार जनजागृती केली जात आहे.