क्रीडा
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनच्या विद्यार्थीनीचा राष्ट्रीय पातळीवर उज्वल कामगिरी
₹४,०००/- रोख बक्षीस

लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनच्या विद्यार्थीनीचा राष्ट्रीय पातळीवर उज्वल कामगिरी
₹४,०००/- रोख बक्षीस
बारामती वार्तापत्र
लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनच्या इयत्ता ८ वीतील विद्यार्थीनी स्नेहल झोळे हिने ‘खेलो इंडिया अस्मिता पेनकॅक सिलाट लीग’ स्पर्धेमध्ये तांडिंग फाईट प्रकारात रौप्यपदक पटकावले. तिच्या या शानदार कामगिरीबद्दल तिला प्रमाणपत्र व ₹४,०००/- रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
स्नेहलच्या या यशाबद्दल लडकत स्कूल ऑफ फाउंडेशनचे संचालक नामदेव लडकत, गणेश लडकत, प्राचार्य रामचंद्र वाघ आणि संपूर्ण शिक्षकवृंदाने तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले व तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या विजयाने लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून स्नेहलची ही कामगिरी सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली असल्याचे प्रा. नामदेव लडकत यांनी सांगितले.