पुणे

लवकरच जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणूका होणार ;उपमुख्यमंत्री अजित पवार

 कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली

लवकरच जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणूका होणार ;उपमुख्यमंत्री अजित पवार

कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

लवकरच जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत, अशी घोषणा करताना पुणे जिल्ह्यांत वातावरण राष्ट्रवादीयम झालंय, आता कार्यकर्त्यांनो कामाला लागा.  जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकीमध्ये चांगली ताकद लावून आपल्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

आज (मंगळवार) अजित पवार यांच्या हस्ते पुण्याच्या मांजरीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावली. जयंत पाटलांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन पार पडल्यावर अजित पवार यांनी छोटेखानी भाषण केलं. या भाषणात त्यांनी जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं तसंच कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला.

लवकरच जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका

अजित पवार म्हणाले, लवकरच जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांनी झटकून कामाला लागण्याची गरज आहे. जनतेचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आघाडीला चांगली मदत दिलं, बळ दिलं. पुणे जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे 10 आमदार आणि काँग्रेसचे 2 आमदार निवडून दिले. आता पुण्यात वातावरण राष्ट्रवादीयम झालंय. इथून पुढेही असंच काम करा, असा कानमंत्र अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अजितदादांनी कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकली

“जनतेमुळे, कार्यकर्त्यांमुळे आम्ही विविध पदं भूषवत असतो. कुणी आमदार, कुणी खासदार, मी उपमुख्यमंत्री जनतेमुळे आहे. सगळ्यांनाच पदाची अपेक्षा असते. दरम्यान , कार्यकर्ता केवळ काम करत असतो. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांना पदं कशी मिळतील, हे पाहिलं जाईल, अशा शब्द अजित पवार यांनी दिला. तसंच जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना एकत्र करुन समतोल साधण्याचं कामंही केलं जाईल. शेवटी पक्षात आलेल्यांना समाधानी करणं देखील महत्वाचं असतं”, असंही अजित पवार म्हणाले.

अजितदादांकडून पदाधिकाऱ्याला कानमंत्र

अजित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडल्यानंतर अजित पवारांनी त्यांनाही कानमंत्र दिला. गेल्या काही काळापासून तू जनतेचे प्रश्न सोडवतो आहेस. आता कार्यालय झालंय. इथून पुढेही जनतेसाठी तू झटून काम करशील. पण हे काम करत असताना सगळेच प्रश्न सुटतात असे नाही. माझ्याकडूनही 100 टक्के प्रश्न सुटत नाही. पण होणारं कामं झालंच पाहिजे, असा आग्रह असावा. मी ही तसंच करतो आणि तू ही हे ध्यानात ठेवं, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!