स्थानिक
लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया बारामती शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद कळंत्रे यांची निवड
उपाध्यक्षपदी प्रशांत खटावकर

लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया बारामती शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद कळंत्रे यांची निवड
उपाध्यक्षपदी प्रशांत खटावकर
बारामती वार्तापत्र
लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया बारामती शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद कळंत्रे यांची तर उपाध्यक्षपदी प्रशांत खटावकर व संजय घोरपडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
फेडरेशनच्या पुणे शाखा अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अनिल दंडवते यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम पार पडला. सुधाकर खटावकर, राजन कळंत्रे, माणिक शिंदे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी गोरख तावरे, सागर शेकडे, दत्तात्रय पवार, बिपिन शेटे, महादेव आगवणे, दिलीप खलाटे आदी कार्यकारिणी सदस्य यावेळी उपस्थित होते.