‘लाळ खुरकूत’ रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचा शुभारंभ लासुर्णेतून
इंदापूर तालुक्यासाठी १ लाख ५८ हजार लाळ खुरकत लस प्राप्त

‘लाळ खुरकूत’ रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचा शुभारंभ लासुर्णेतून
इंदापूर तालुक्यासाठी १ लाख ५८ हजार लाळ खुरकत लस प्राप्त
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ‘लाळ खुरकूत’ रोग प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या फेरीचा शुभारंभ शनिवारी ( दि.१८ ) लासुर्णे (ता.इंदापूर) येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सदरीच्या लसीकरणाचा कार्यक्रम पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण तालुक्यात राबविला जात आहे.इंदापूर तालुक्यासाठी मोठ्या जनावरांना १ लाख ५८ हजार लाळ खुरकत लस मात्रा प्राप्त झाली आहे. ही लस तालुक्यामधील संपूर्ण मोठ्या जनावरांना टोचली जाणार असून लाळ खुरकूत लसीकरणाची दुसरी फेरी २१ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. तालुक्यामध्ये सध्या काही भागात लाळ खुरकत रोगाची लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे ही लस तालुक्यातील जनावरांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण पशुपालकांनी सर्व जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी केले.
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन अमोल पाटील,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.