लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे नृत्य करणाऱ्या बारामतीच्या अवलियाची सोशल मीडियावर लईच हवा
लावणी नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल

लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे नृत्य करणाऱ्या बारामतीच्या अवलियाची सोशल मीडियावर लईच हवा
लावणी नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील पानगल्ली रिक्षा स्टॉप वर रिक्षा चालवणाऱ्या बाबजी कांबळे या रिक्षाचालकाने वाजले की बारा या लावणीवर नृत्य केल्याचा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला असून त्यांनी लावणी सम्राज्ञीलाही लाजवेल असे नृत्य केले आहे.
बाबाजी कांबळे यांनी नटरंग या मराठी चित्रपटातील मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा या गाण्यावरील नृत्य केलेला व्हिडीओ एवढा वायरल झाला आहे की,सोशल मीडियावर फक्त बाबाजी कांबळे यांचीच हवा दिसून येत आहे.
कसा झाला व्हिडीओ व्हायरल..?
दोन दिवसांपूर्वी बाबा कांबळे हे अन्य सहकाऱ्यांसमवेत बारामतीत माळेगाव रस्त्यावरील पंपावर आपल्या रिक्षात गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी वीज नसल्यानं तीन तास थांबावं लागेल असं सांगण्यात आलं. तीन तास काय करायचं असा विचार सुरु असतानाच बाबा कांबळे यांनी एका लावणीवर नृत्य सुरु केलं.. त्यांचं हे नृत्य पाहून त्यांचे रिक्षाचालक सहकारीही तिथे आले. रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांनाही हे नृत्य पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यातच काहींनी त्यांचं हे नृत्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं.. आणि बघता बघता हा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला..
लहानपणापासून नृत्याची आवड..!
बारामती तालुक्यातल्या गुणवडी येथील रहिवासी असलेले बाबा कांबळे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत.. त्यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे.. त्यातूनच त्यांनी विविध नृत्य प्रकार आत्मसात केलेत.. त्या दिवशी फावला वेळ मिळाला आणि मित्रांचं मनोरंजन व्हावं यासाठी हे नृत्य केल्याचं बाबा कांबळे सांगतात.
बाबा कांबळे यांचा आनंद गगनात मावेना..
सहज गंमत म्हणून केलेल्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं बाबा कांबळेही आनंदात आहेत. आपण कधी विचारही केला नव्हता की या नृत्याचा व्हिडीओ इतका व्हायरल होईल. पण, आता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपला आनंद गगनात मावत नाही असं बाबा कांबळे सांगतात..
संधी मिळाली तर पुढे वाटचाल करु..
बाबा कांबळे यांच्या नृत्याला नेटकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.. आजपर्यंत कधीच अशा पद्धतीनं प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र एकाच रात्रीत आपल्याला एका व्हिडीओनं सर्वत्र प्रसिद्धी मिळवून दिलीय. आता पुढे जर संधी मिळाली तर आपण आणखी या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करु असंही बाबा कांबळे सांगतात.
बाबाजी कांबळे हे बारामती तालुक्यातील गुणवडी गावचे रहिवासी असून ते ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत.