लास घेण्यापूर्वी रक्तदान करा…. डॉ. अशोक दोशी.
कोरोना बरोबरच रक्तदाब, अशक्तपणा, हृदयरोग, किडनीचे आजार या बरोबरच बाळंतपन यासाठी देखील रक्ताची मागणी होत आहे

लास घेण्यापूर्वी रक्तदान करा…. डॉ. अशोक दोशी.
कोरोना बरोबरच रक्तदाब, अशक्तपणा, हृदयरोग, किडनीचे आजार या बरोबरच बाळंतपन यासाठी देखील रक्ताची मागणी होत आहे.
बारामती वार्तापत्र
येत्या 1 में पासुन 18 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे त्यामुळे लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी केले आहे.
पुढे डॉ . दोशी म्हणाले की, लशीचा शेवटचा डोस धेतल्यानंतर पुढील 28 दिवस रक्तदान करता येणार नाही त्यामुळे रक्तदान करण्याकडे रक्तदात्यांचा काल कमी झाल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होईल त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
तसेच आपल्या बारामती आणि परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने संचार बंदी आहे त्यामुळे पुरेश्या प्रमाणात रक्तदान शिबिरे होत नाहीत त्यातच लस घेतल्यास 28 दिवस रक्तदान करता येणार नाही या कारणाने येत्या में आणि जून या कालावधीत रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला तर गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य होईल त्यामुळे शक्यतो लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन डॉ दोशी यांनी केले आहे.
सध्या बारामती आणि परिसरात कोरोना आणि इतर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची मागणी होत आहे कोरोना बरोबरच रक्तदाब, अशक्तपणा, हृदयरोग, किडनीचे आजार या बरोबरच बाळंतपन यासाठी देखील रक्ताची मागणी होत आहे या कारणास्तव रक्त आणि रक्तघटकांची मागणी होत आहे म्हणून येत्या काळात इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन दोशी यांनी केले आहे.