लाॅकडाऊन मधील बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि एक वर्ष वयाच्या मुलाचा खून करून त्याने घेतला गळफास !
दोन महिन्यांपासून त्यांचे हे काम बंद झाले होते. ते कदमवाकवस्तीत कुटुंबासोबत राहत होते. हे काम बंद झाल्यानंतर कुटुंब चालवणे कठीण झाले होते

लाॅकडाऊन मधील बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि एक वर्ष वयाच्या मुलाचा खून करून त्याने घेतला गळफास !
दोन महिन्यांपासून त्यांचे हे काम बंद झाले होते. ते कदमवाकवस्तीत कुटुंबासोबत राहत होते. हे काम बंद झाल्यानंतर कुटुंब चालवणे कठीण झाले होते
लोणी काळभोर;बारामती वार्तापत्र रिपोर्ट
बेरोजगारीला कंटाळून एकाने पत्नीचा गळा दाबून व एक वर्षाच्या मुलाचा गळा सुरीने चिरून खून करत स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कदमवाकवस्तीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय 28), मुलगा शिवतेज (वय 1 वर्ष) असे खून झालेल्या मायलेकाची नावे आहेत. तर हनुमंत शिंदे (वय 38) याने स्वतः खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शिंदे हे सीमेंटच्या गादीवर चालक म्हणून काम करत होते.
पण, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे हे काम बंद झाले होते. ते कदमवाकवस्तीत कुटुंबासोबत राहत होते. हे काम बंद झाल्यानंतर कुटुंब चालवणे कठीण झाले होते. सध्या काही कामधंदाही नव्हता.
बेरोजगारीला कंटाळून टोकाचं पाऊल
बेरोजगारीला कंटाळून हनुमंत शिंदे याने कुटुंबाला संपवल्याची माहिती आहे. हत्या आणि आत्महत्या प्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशमधील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात कौटुंबिक हत्या-आत्महत्यांचं वाढतं सत्र पाहायला मिळत आहे. बेरोजगारी वाढल्याने अश्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या
गाडी विकून येणारे पैसे माझ्या आईला द्या, असा व्हॉईस मेसेज चुलत भावाला पाठवून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. 31 वर्षीय तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आयुष्य संपवलं.
चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुणाने पानशेत रस्त्याला लागून खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. तो पुण्यातील सोमवार पेठ भागातील रहिवासी होता. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.