लीनेस क्लब चा’ ज्येष्ठकर्मी ‘पुरस्कार वितरण संपन्न
नियुक्ती झाल्याबद्दल धनश्री गांधी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
लीनेस क्लब चा’ ज्येष्ठकर्मी ‘पुरस्कार वितरण संपन्न
नियुक्ती झाल्याबद्दल धनश्री गांधी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव,मार्गदर्शन घेऊन संस्कारक्षम पिढी घडविण्याचे जवाबदारी सर्वांची असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषद च्या मा. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केले.
लीनेस क्लब ऑफ बारामती यांच्या वतीने विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना ‘ज्येष्ठकर्मी ‘पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी पौर्णिमा तावरे बोलत होत्या या वेळी नगरसवेक किरण गुजर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी, माजी नगराध्यक्षा मंगला सराफ, भारती मुथा, जयश्री सातव,राष्ट्रवादी च्या महिला तालुका अध्यक्षा वनिता बनकर व लीनेस क्लब च्या अध्यक्षा सुमन जाचक, सचिव कीर्ती पहाडे, खजिनदार उल्का जाचक, सहसचिव शुभांगी चौधर, सदस्या राजश्री आगम, राणी धायगुडे आदी मान्यवर उपस्तित होत्या
बारामती च्या लौकिकाला साजेल असे ज्येष्ठ नागरिकांसाठी व समाज्यातील विविध घटकासाठी सामाजिक योगदान देत लीनेस क्लब करीत असलेले कार्य कौतकास्पद असल्याचे नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.
वृद्ध इतरांचा आधार घेतात तर ज्येष्ठ इतरांना अनुभवाचा भक्क्म आधार देत असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी सांगितले लीनेस क्लब च्या विविध सामाजिक कार्याची माहिती अध्यक्षा सुमन जाचक यांनी दिली.
मंगला बोरावके, लता करे यांनी मनोगत व्यक्त केले उत्कृष्ट संयोजन केल्याबद्दल बदल शुभांगी चौधर, राजश्री आगम, राणी धायगुडे व फेडरेशन ऑफ हूमड जैन समाज राज्य कार्यकारणी वर नियुक्ती झाल्याबद्दल धनश्री गांधी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पसायदान गणेश देव सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार प्रदर्शन शुभांगी चौधर यांनी केले.