क्राईम रिपोर्ट

लैंगिकदृष्ट्या कमकुवत असलेला पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध इतरांशी संबंध ठेवण्यासाठी भाग बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

पाच लोकांना अटक करण्यात आलेली आहे.

लैंगिकदृष्ट्या कमकुवत असलेला पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध इतरांशी संबंध ठेवण्यासाठी भाग बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख

पाच लोकांना अटक करण्यात आलेली आहे.

क्राईम;बारामती वार्तापत्र

बारामती शहर पोलीस ठाण्यात  दि. ९ डिसेंबर रोजी तक्रार दिली की तिचा विवाह 2016 मध्ये झालेला होता एक वर्षानंतर पतीला लैंगिक समस्या जाणवू लागली. असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश करण्यात आला. मात्र या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. गोपनीयता पाळण्यामागे नेमके कारण काय याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

एक अतिशय धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. पतीला लैंगिक समस्या असल्याने त्याने स्वत:च्या पत्नीला स्वत:च्याच मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती तालुक्यातील एका गावात ही विकृत घटना घडली असून पीडित महिलेने पतीसह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बारामती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी पती आणि पीडितेचा विवाह 2016 मध्ये झाला होता. वर्ष भर सुखाचा संसार सुरू होता. पण कालांतराने 2017 मध्ये पतीला लैंगिक समस्या जाणवू लागल्या. त्यामुळे त्याने त्याच्या बायकोला आपल्याच मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मित्राशी शारीरिक संबंध ठेवताना बघून पतीच्या देखील लैगिंक भावना जागृत होतील आणि त्यानंतर तो बायकोशी शारीरिक संबंध ठेवू शकतो, या विचाराने त्याने असं करण्यास सांगितल्याचा धक्कादायक दावाही पत्नीने केला आहे.

पती की हैवान?

तक्रार करण्य़ात आलेला इसम त्याच्या मित्रांना बायकोशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असून पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला तर तो तिचे हात पकडून तिच्यावर जबरदस्ती करत. तसंच संबधित प्रकाराबाबत बाहेर सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने पत्नीला दिली होती. पण या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने ‘हे थांबवा नाहीतर, मी जीवाचे बरे वाईट काहीतरी करून घेईल’ अशी धमकी दिली होती. त्यांनंतर काही काळ पतीने पत्नीवर जबरदस्ती करणे थांबवले होते. परंतु पुन्हा एकदा पतीने सर्व प्रकार सुरु केल्याने तिने माहेरी जाऊन सर्व प्रकार माहेरच्यांना सांगितला. ज्यानंतर बारामती शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला पतीसोबत त्याच्या 7 ते 8 मित्रांवर देखील 10 डिसेंबरला  जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिला ही 24 वर्षांची असून या प्रकरणी बारामती पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button