प्रशासकीय इमारत आहे का? अस्वछता,कचरा डेपो? नागरिकांचा संतप्त सवाल.
प्रशासकीय इमारत मध्ये नियमित पणे स्वछता नाही.
प्रशासकीय इमारत आहे का? अस्वछता,कचरा डेपो? नागरिकांचा संतप्त सवाल.
प्रशासकीय इमारत मध्ये नियमित पणे स्वछता नाही.
बारामती:वार्तापत्र बारामती,इंदापूर,दौंड तालुक्यातील अनेक नागरिक विविध शासकीय कामानिमित्त बारामती च्या प्रशासकीय इमारत मध्ये येत असतात व प्रत्येक मजल्यावर,स्वछता गृहात परिसरात दिसते ती म्हणजे अस्वच्छता व कचरा.
बारामती येथील प्रशासकीय भवनात बारामती प्रांताधिकारी व बारामती तहसिलदार कार्यालय इत्यादी कार्यालये आहेत. सध्या कोविड 19 हा विषाणु वेगाने पसरतो आहे. शासनाने निर्जंतुकीकरणासाठी वरचेवर साबण लावून हात धुणे, सॅनिटायझर वापरणे इत्यादी वैयक्तिक स्वच्छतेचे उपाय सांगितले आहेत. मात्र बारामतीच्या प्रशासकीय भवनातील नागरिकांसाठीच्या स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबण तर सोडाच पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाविरूध्दची लढाई ढिली पडलेली आहे. राज्यभर कोरोनाविरोधात लढण्यासाठी बारामती पॅटर्नचा गवगवा करण्यात आला. मात्र शासकीय कार्यालयातच हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रशासकीय भवनातील स्वच्छतागृहात साबण पाण्याची सोय करावी. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी बारामतीच्या परिसरातून येणारे नागरिक प्रशासकिय विविध कामासाठी आपल्या बारामतीच्या विविध कार्यालयात विविध कामासाठी येत असतात त्यांनाही असुविधेचा सामना करावा लागत आहे नाक तोंड दाबून उग्र वास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने या कडे लक्ष देण्याची गरज आमच्याकडे बोलून दाखवत आहेत तरी बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छता दिसून आसन स्वच्छता करण्यात यावी एवढीच माफक अपेक्षा आहे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था व्हावी!
उपमुख्यमंत्री अजित पवार वेळोवेळी विविध निधी विकासा साठी देत असताना कितेयक कोटीच्या प्रशासकीय इमारत मध्ये ‘मेन्टेन्स्ट ‘ साठी निधी उपलब्ध नाही या बाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत