लोककलावंतांच्या प्रमुख मागण्यांसाठी इंदापूर शहरात अनोखी शोभायात्रा
अनेक लोककलावंतांनी घेतला सहभाग

लोककलावंतांच्या प्रमुख मागण्यांसाठी इंदापूर शहरात अनोखी शोभायात्रा
अनेक लोककलावंतांनी घेतला सहभाग
बारामती वार्तापत्र
वाघ्या मुरळी लोककलावंत अनादिकाळापासून कलेच्या माध्यमातून धर्मजागरण,कुलधर्म कुलाचार पालन,समाज प्रबोधन याद्वारे समाजसेवेचे कार्य करत असतात समाजातील भाविक भक्तांच्या आश्रयावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत असतो.मात्र मागील वर्षी अतिवृष्टी त्यानंतरची निवडणूक आचारसंहिता यामुळे कलावंतांना जगण्यापुरते ही उत्पन्न मिळू शकले नाही.तसेच सध्या देखील मार्च 2020 पासून चालू असलेल्या कोरोना संकटात सापडून उपासमारीला तोंड देत आहेत. त्यामुळे आज दि.20 रोजी लोककलावंतांनी इंदापूर शहरातून विविध प्रकारचे नृत्य सादर करत विविध घोषणा देत इंदापूर प्रशासकीय कार्यालयावर अनोख्या प्रकारे आंदोलन केले तसेच पुढील प्रमाणे मागणी शासनाकडे केल्या.
१.वाघ्या मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा.
२. वाघ्या मुरळी कलावंतांच्या मुला-मुलींचा शिक्षणाचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात यावा.
३.वाघ्या मुरळी लोककलेस शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करण्यात यावी.
४. या कलावंतांच्या विकासासाठी शासनाकडून जमीन घर या स्वरूपात योजना मंजूर करण्यात यावी.
५.वाघ्या मुरळी कलावंतांना कायमस्वरुपी पेन्शन योजना सुरू करावी.
६.महाराष्ट्रातील लोक कलावंतांसाठी स्वतंत्र लोक कलावंत आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे.
७. नियमांचे पालन करून लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी.
८. देवालये, मंदिरे, रावळे खुली करावी
या प्रमुख मागण्यां संदर्भात शोभा यात्रेच्या स्वरूपात आंदोलन करत तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.