आपला जिल्हा

लोकनेते शरदचंद्रजी पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुली संरक्षण सुरक्षा अभियान राबविण्याची मागणी 

सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवावा...

लोकनेते शरदचंद्रजी पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुली संरक्षण सुरक्षा अभियान राबविण्याची मागणी

सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवावा…

इंदापूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) गटाचे लोकनेते शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यात महिला व मुलींच्या संरक्षण व सुरक्षेसाठी विशेष सामाजिक अभियान राबवावे, अशी ठोस मागणी पक्षाच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्षा छाया पडसळकर यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या अभियानांतर्गत महिला व मुलींसाठी कराटे, जुडो व प्राथमिक सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिरे, महिला सुरक्षा व सायबर कायद्यांवर कार्यशाळा, महिला हेल्पलाईन क्रमांकांची माहिती, शाळा महाविद्यालयांत विशेष मार्गदर्शन सत्रे, किशोरवयीन मुलींसाठी सुरक्षित इंटरनेट वापराविषयी जनजागृती, तसेच सामाजिक रॅली, पोस्टर व स्लोगनद्वारे समाजप्रबोधन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रशासन, तालुका व गाव पातळीवरील महिला दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था व महिला आयोग यांच्या समन्वयातून तात्काळ मदत, समुपदेशन व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवावा, अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. इंदापूर, बावडा, भिगवन, वालचंदनगर येथील पोलीस ठाण्यात देखील हे निवेदन देण्यात आले आहे.
Back to top button