लोकशाहीची पाळेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच – डॉ. जीवन सरवदे
छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती..

लोकशाहीची पाळेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातच – डॉ. जीवन सरवदे
छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती..
इंदापूर प्रतिनिधी –
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती महोत्सवानिमित्त इंदापूर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी वरील मत व्यक्त केले.
महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रतिमेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे ,कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर , प्रा. अमोल मगर , प्राध्यापिका सुवर्णा जाधव , प्राध्यापिका तृप्ती राऊत , प्रा. नामदेव पवार , राहुल सरडे , तानाजी भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
डॉ.जीवन सरवदे म्हणाले की ,’ छत्रपती शिवाजी महाराज हे राजा असून देखील लोकशाहीला लाजवेल असा राज्यकारभार करणारे जगातील थोर व्यक्तिमत्व आहेत त्यांना जयंती निमित्त मनापासून अभिवादन करतो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तानाजी कसबे यांनी केले.आभार प्रा. आत्माराम फलफले यांनी मानले.