बारामती येथील पाटस रस्त्यावरील तीन मोऱ्या नजिक झालेल्या अपघातात आजोबा आणि नातीचा दुर्देवी अंत
पत्रकार कल्याण पाचांगणे यांचे चुलतभाऊ

बारामती येथील पाटस रस्त्यावरील तीन मोऱ्या नजिक झालेल्या अपघातात आजोबा आणि नातीचा दुर्देवी अंत
पत्रकार कल्याण पाचांगणे यांचे चुलतभाऊ
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये नीरा डावा कालव्यात बुडून आजोबा आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. नीरा डावा कालव्यात दुचाकी पडल्याने झालेल्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे बारामती आणि परिसरात शोक व्यक्त केला जातोय. उत्तम पाचंगणे हे आपल्या 10 वर्षीय नातीसह नीरा डावा कालव्यावरुन जात होते. यावेळी तेरा मोरीवरुन जाताना पाचंगणे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीसह दोघेही कॅनॉलमध्ये पडले.
कॅनॉलमध्ये आवर्तन सुरु अशल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. त्यामुळे आजोबा आणि नात दोघेही वाहून गेले. पुढे मेडद इथं या दोघांचे मृतदेह आढळून आले. उत्तम नामदेव पाचंगणे (वय 52) आणि समृद्धी विजय चव्हाण (वय 12) अशी मृतांची नावं आहेत. रविवारी सकाळी पाचंगणे हे दुचाकीवरुन कुरकुंभ इथून नातीसह बारामतीला निघाले होते. काही अंतरावर गेल्यावर तिथे 3 मोऱ्या आहेत. एका बाजूला नीरा डावा कालवा, तर दुसऱ्या बाजूला इंग्रजांच्या काळातील पूल आहे. या पुलावरुन जात असताना पाचंगणे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ते गाडीसह कालव्यात कोसळले.
याठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यामुळे दोघेही वाहून जाऊ लागले. आजोबांनी नातीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. पुढे मेडद इथं स्थानिकांना दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी उत्तम पाचंगणे यांच्या खिशातील वस्तू तपासल्यानंतर एक कार्ड सापडलं. त्यावरुन स्थानिकांनी कुटुंबियांशी संपर्क केला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे पाचंगणे आणि चव्हाण परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.