दुर्मिळ ! बारामतीत आज नागरिकांना खगोलीय पर्वणी ,सूर्याच्या अनोख्या रुपाने बारामतीत कुतूहल !
तब्बल दोन तास बारामतीकरांना पहायला मिळालं अनोखं दृष्य

दुर्मिळ ! बारामतीत आज नागरिकांना खगोलीय पर्वणी ,सूर्याच्या अनोख्या रुपाने बारामतीत कुतूहल !
तब्बल दोन तास बारामतीकरांना पहायला मिळालं अनोखं दृष्य
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात आज निसर्गाचं एक अनोख रुप पहायला मिळालं. दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान सूर्याभोवती सप्तरंगी तेजोवलय निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली पहायला मिळाली. तब्बल दोन तास बारामतीत निसर्गाचं हे अनोखं रुप पहायला मिळालं.
सन हलो याचा हा प्रकार असल्याचे काही जाणकारांनी सांगितले.काही जणांनी याला ब्रम्हधनुष्याचेही नाव दिलेले होते. दुपारी सूर्याभोवती हे तेजोमय सप्तरंगी खळे काही जणांना दिसल्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून याचे फोटो येऊ लागल्यानंतर अनेकांनी त्याचा आनंद घेतला. काही जणांनी तर आयुष्यात पहिल्यांदाच असे सूर्याभोवतीचे गोलाकार सप्तरंगी खळे पाहिल्याचे सांगितले.
सूर्याभोवती गोलाकार तेजोवलय म्हणजे 22 अंशांचे खळे अनेक शहरात या पूर्वीही पाहिले गेल्याच्या नोंदी आहेत. बारामतीत आज दुपारी सूर्य तप्त असताना व आकाशात ढगांची गर्दी असतानाही सूर्याभोवती मात्र काही काळ अजिबातच ढग नव्हते व याच काळात हे गोलाकार सप्तरंगी खळे अनेकांनी आपल्या मोबाईलसह कॅमे-यातही टीपले. हा प्रकार नेमका काय याचा उलगडा मात्र अनेकांना झाला नव्हता.
बारामती शहरात आज सकाळपासूनच तापमानात वाढ झालेली अनुभवायला मिळत होती. सूर्याभोवती अशा पद्धतीचं तेजोमय वलय अनेकदा निर्माण झालेलं असून ग्रामीण भागात याला सूर्याला खळे पडणं असं म्हणतात.