क्राईम रिपोर्ट

लोणावळा व दौड परीसरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

सापळा रचून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या आरोपी ताब्यात

लोणावळा व दौड परीसरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

सापळा रचून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या आरोपी ताब्यात

क्राईम; बारामती वार्तापत्र

लोणावळा परिसरामध्ये व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून ग्राहकांना फोटो पाठवून मुलींचे दर ठरवून या मुली गाडी मधून लोणावळा परिसरातील ग्राहकांना पुरवल्या जात आहेत, अशी माहिती पोलीसांना मिळाली होती.

मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने दहशतवाद विरोधी कक्ष पथक पुणे ग्रामीण व लोणावळा ग्रामीण पोलीस यांनी बनावट ग्राहक द्वारे सापळा रचून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या आरोपी नामे जय उर्फ धनंजय कातवारू राजभर, वय ३७ वर्षे, सध्या रा.नांगरगाव लोणावळा, मूळ रा.टिळक नगर चेंबूर मुंबई यास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या बातमीनुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहकाद्वारे जय उर्फ धनंजय याच्याशी व्हॉट्सअॅप वर संपर्क केला असता. त्याने व्हॉट्सअॅप वर वेश्या व्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो वर्सेली लोणावळा येथे घेऊन येतो
असे कळल्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचला त्यानंतर जय उर्फ धनंजय हा टोयाटो कोरोला गाडीमधून दोन मुली घेऊन तेथे आल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाने जय उर्फ धनंजय यास ताब्यात घेतले. गाडीमध्ये असणाऱ्या वेश्या व्यवसायासाठी
आणले गेलेल्या दिल्ली येथील दोन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, पो.हवा ईश्वर जाधव, पो.ना. विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व स्थानिक गुन्हे शाखा सुजाता कदम, पुनम गुंड तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे युवराज बनसोडे, पुष्पा घुगे, सिद्धेश्वर शिंदे या पथकाने केली.

दौड परिसरामध्ये मौजे खडकी ता.दौड, जि.पुणे, पुणे सोलापुर हायवे लगत सुर्या हॉटेल व लॉजिंग येथे देह विकीचा व्यवसाय चालु असलेबाबत माहिती डॉ.अभिनव  देशमुख पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांना मिळाली होती, सदर बाबत मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी दहशतवाद विरोधी कक्ष पथक पुणे ग्रामीण व दौड पोलीस यांना सदर बातमीची खातर जमा करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

सदर बातमीची खात्री करण्याकरीता खडकी या गावी बनावट ग्राहकाद्वारे मोबाईलवर वेश्यागमनाकरीता मुलींची मागणी केली
असता वेश्यागमनाचा मोबदला ठरविण्यात आला. त्यावरून बनावट ग्राहक सुर्या लॉजमध्ये गेल्यावर काही वेळाने पोलीसांनी लॉजमध्ये प्रवेश केल्यावर रिसेप्शन येथे एक इसम नामे रविश शेट्टी वय ३५ वर्षे, सध्या रा.सूर्य हॉटेल खडकी, ता.दौंड जि.पुणे, मिळुन आला. त्यानंतर लॉजमधील रूम चेक करता एका रूममध्ये एक मुलगी व बनावट ग्राहक मिळुन आला त्यावेळी बनावट ग्राहकाने त्याचेकडील वेश्यागमनासाठी लागणारे मोबदला पैसे रविश शेट्टी यास दिले बाबत सांगितले आहे.

तरी मौजे खडकी गावचे हद्दीत सुर्या हॉटेल-लॉजिंग येथे पुणे-सोलापूर महामार्ग जवळ ता.दौंड, जि.पुणे, येथे आरोपी नामे १) रवीश शेट्टी, सध्या रा.सूर्य हॉटेल खडकी, ता.दौंड जि.पुणे, मूळ रा.मेलासुर, ता.कुंदापूर, जि.उडपी, राज्य कर्नाटक, हा संगनमताने त्याचे ताब्यातील सुर्या हॉटेल व लॉजींग येथे ६ महीलांनकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व स्वत:ची उपजीविका चलवण्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेत असलेने त्याचे व त्याचे साथिदारांविरूध्द दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३९/२०२१, भा. द.वि. कलम ३७०,३४, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६,७,९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा डॉ अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी दौड विभाग धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस  निरीक्षक अर्जुन मोहिते, सपोनि सचिन कांडगे, पो.ना.अतुल ढेरे, मपोशि, स्नेहल कामठे, मपोशि पुनम थोरात सर्व नेम सायबर पोलीस स्टेशन व किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!