मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे नेते ; प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर !

आंबेडकर यांनी तीन महिने सुट्टीवर जाण्याचं कोणतंही कारण दिलं नाही

वंचित बहुजन आघाडीचे नेते ; प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर !

आंबेडकर यांनी तीन महिने सुट्टीवर जाण्याचं कोणतंही कारण दिलं नाही

मुंबई: बारामती वार्तापत्र

राज्यातील आणि देशातील अनेक नेते उन्हाळ्यात हवा बदलासाठी परदेशात सुट्टीवर जात असतात. त्यात काही नवीन नसते. ते सुट्टीवर गेले तरी पक्षाकडे आणि राजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते. मात्र, एखादा नेता तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर जाण्याची घटना क्वचितच घडते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. आंबेडकर यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यातून त्यांनी ही माहिती दिली आहे. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकात विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असं आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram