शैक्षणिक
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, पाहा कुठे आणि कधी पाहता येणार निकाल
दि 8 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपली, पाहा कुठे आणि कधी पाहता येणार निकाल
दि 8 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार बुधवारी ( दि 8 जून) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
उद्या दुपारी एक वाजता निकाल लागणार.हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर www.mahahsscboard.in बघायला मिळणार आहे. निकाल पाहण्यासाठी परीक्षेचा सीट नंबर/ रोल नंबर आणि आईचं नाव टाकणं आवश्यक असणार आहे. सीट नंबर चुकला तर आईच्या नावाने निकाल पाहता येणार आहे.