विनामास्क फिरणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची दंडात्मक कारवाई
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने नियम पाळण्याचे आवाहन

विनामास्क फिरणाऱ्यांवर इंदापूर पोलिसांची दंडात्मक कारवाई
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने नियम पाळण्याचे आवाहन
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना काही भहादर मात्र विनामास्क फिरत आहेत.त्यामुळे इंदापूर पोलिसांकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत स्थानिक पोलीस प्रशासनास कोविड नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आप्पासाहेब मोरे,हो.गा मयूर लोंढे,तेजस कांबळे,सुजित चितारे,रवींद्र काळे,स्वप्नील कुंभार हे कारवाई करत आहेत.आत्तापर्यंत जवळपास ३५० ते ४०० विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून साधारणतः ८५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझर,मास्क तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.