वंचित बहुजन युवा आघाडीचे बारामतीत बोधगया महाविहारासाठी स्वाक्षरी मोहीम आंदोलन
नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद

वंचित बहुजन युवा आघाडीचे बारामतीत बोधगया महाविहारासाठी स्वाक्षरी मोहीम आंदोलन
नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद
बारामती वार्तापत्र
वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, निलेशजी विश्वकर्मा साहेब यांच्या सुचने नुसार राज्यभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन स्वाक्षरी मोहीम आंदोलन सुरू आहे.
बोधगया (बिहार) याठिकाणी तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती त्या ठिकाणी सम्राट अशोक यांनी महाबोधी महाविहाराची स्थापना केली होती. ज्या पद्धतीने हिंदू मंदिरामध्ये हिंदू पुजारी असतात, ख्रिश्चन धार्मियांची पूजा अर्चा फादर करतात, मुस्लिम धार्मियांची पूजा मुस्लिम करतात त्याच पद्धतीने बौद्ध विहाराची पुजा बोद्ध भन्ते यांच्या कडून होणे गरजेचे आहे तरी देखील या बोद्ध विहारात ब्राह्मण पुजारी नेमून तथागत गौतम बुद्धांचे विद्रूपीकरण केले आहे हे सर्व बुद्धगया महाविहार 1949 च्या अन्याय कारक कायद्यातील तरतुदी मुळे होत आहे म्हणून या अंदोलनात मुख्य मागण्या.
१) बुद्धगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा.
२) बोधगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.
या मागण्या करण्यात आल्या आहेत हे आंदोलन बारामती शहरात वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्वच्या वतीने जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 24 /4 /2025 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आले या आंदोलनास बारामती शहर व तालुक्यातील नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला.
या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब, संपर्कप्रमुख ऍड वैभव कांबळे, कायदेशीर सल्लागार ऍड संतोष कांबळे, वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात, सहसचिव कृष्णा साळूंके, बारामती युवा तालुकाध्यक्ष अनुप मोरे, शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, अक्षय गायकवाड, किशोर मोरे, अरुण खराडे पाटील, सागर गवळी, विकास माने, आनंद जाधव, आर्यन साळवे, कार्तिक भोसले, सुरज गव्हाळे, शाखा अध्यक्ष असिफ शेख, सुमित सोनवणे, वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आदी सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते.
वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या सर्वांचे आभार मानले.