वंजारवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी गोरखनाना चौधर
शासनाच्या विविध योजना तळागाळातील ग्रामस्थांन पर्यंत पोहचवू
वंजारवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी गोरखनाना चौधर
शासनाच्या विविध योजना तळागाळातील ग्रामस्थांन पर्यंत पोहचवू
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी गोरख चौधर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.(सोमवार दि ०९ डिसेंबर)उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने गोरख चौधर हे बिनविरोध निवडुन आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी निलेश लव्हटे यांनी केली.
या प्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, ग्रामसेवक निलेश लव्हटे व माजी उपसरपंच व सदस्य राणीताई चौधर ,ग्रामपंचायत सदस्या चिन्मयनंदा चौधर, दीपाली चौधर, शशिकला जगताप, संगीता मालुसरे व माजी उपसरपंच व सदस्य सागर दराडे , भारत चौधर, बाबासाहेब ठोकळे तसेच राष्ट्रवादी युवक चे कार्याध्यक्ष शरद चौधर ,पोलिस पाटील पोपट चौधर , दराडे,नितीन चौधर, शशिकांत चौधर, ,नवनाथ चौधर,सुनिल चौधर,समीर चौधर,पोपट दराडे ,राहुल शिरसट,अजित चौधर, विजय चौधर,सागर सुर्यवंशी ,सोमनाथ दराडे,बंडू खोगरे,सुनील चौधर, सचिन चौधर,सागर चौधर, विनोद करपे, पिंटू सावंत, मारुती खोमणे, सुभाष झगडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना तळागाळातील ग्रामस्थांन पर्यंत पोहचवू व विकासकामात अग्रेसर राहून आदर्श ग्रामपंचायत म्हणून वंजारवाडी ग्रामपंचायत चा नावलौकिक करू असे निवडीनंतर गोरख चौधर यांनी सांगितले.ग्रामसेवक निलेश लवटे यांनी आभार मानले.