वकील संघटनेच्या अध्यक्षांची अजितदादांना विनंती आणि बारामतीला मंजूर झाली नवीन नऊमजली न्यायालयीन इमारत
तब्बल ७२ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला

वकील संघटनेच्या अध्यक्षांची अजितदादांना विनंती आणि बारामतीला मंजूर झाली नवीन नऊमजली न्यायालयीन इमारत
तब्बल ७२ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झटपट काम मार्गी लावण्यात हातखंडा आहे.
त्यामुळंच अजितदादा जातील तिथे लोक त्यांना भेटण्यासाठी गर्दी करत असतात. दादांच्या याच तत्पर निर्णय क्षमतेचा अनुभव बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रभाकर बर्डे यांना आला. अॅड. बर्डे यांनी बारामती येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीबाबत निवेदन दिले.
अवघ्या पाच आठवड्यात या कामाला अजितदादांनी तब्बल ७२ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. बर्डे यांनी आपला हा अनुभव शब्दबद्ध केला असून दादांचे कौतुक करायला आणि आभार मानायला आपल्याकडे शब्दच नाहीत असं नमूद केलं आहे.
मागील महिन्यात दि. ११ जानेवारी रोजी अॅड. प्रभाकर बर्डे यांनी बारामती येथे नवीन इमारतीला मंजूरी मिळावी याबाबत अजितदादांना निवेदन दिले होते. यामध्ये बारामतीतील जिल्हा व सत्र न्यायालय हलवले जाणार असल्यामुळे खटल्यांची संख्या कमी झाली असून कामगार न्यायालय, सहकार न्यायालयासह अन्य प्राधिकरणे सुरू होण्याची गरज असल्याचे या निवेदनात नमूद केले होते. त्यावेळी अजितदादांनी लवकरच हे काम मंजूर करू असं आश्वासन दिलं. त्यानुसार अवघ्या पाच आठवड्यात ७२ कोटी रुपयांच्या नऊ मजली इमारतीच्या कामाला मंजूरी मिळाली आहे.
अॅड. प्रभाकर बर्डे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, माझ्याकडे दादांचे कौतुक करायला आणि आभार मानायला शब्दच नाहीत. ११ जानेवारी २०२५ रोजी Imperial Lawns चे उद्घाटन करण्यासाठी अजितदादा आले होते. तिथे मी दादांना बारामती येथे न्यायालयाची नवीन इमारत प्रस्तावित असून त्याची मंजुरी लवकर मिळाली तर फार बरे होईल असे पत्र बारामती वकील संघटनेच्या वतीने दिले. काही करून दादांनी लवकरात लवकर नवीन इमारतीच्या मंजुरीचे काम मार्गी लावावे ही विनंती दादांना केली.
या मागचे कारण असे की प्रत्येक तालुक्यात आता बारामती येथून जिल्हा व सत्र न्यायालय जाणार असल्यामुळे बारामती येथे केसेस फार कमी झाल्या आहेत. तसेच अनेक प्रकारची इतर न्यायालये जसे लेबर कोर्ट, सहकार न्यायालय, इतर न्यायाधिकरणे बारामती येथे येणे गरजेचे आहे. बारामती मध्ये वकिलांची संख्या १००० पेक्षा जास्त झाली आहे.
यावरूनच दादांना ११ जानेवारी २०२५ रोजी नवीन इमारतीला मंजुरी मिळावी याबाबत पत्र दिले. त्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक यांचा मला दोन-तीन वेळा फोन आला. अवघ्या चार दिवसात त हे नवीन इमारतीचे प्रपोजल मंत्रालयात पोचले. आणि आज 18 फेब्रुवारी म्हणजे जेमतेम पाच आठवड्यात या तब्बल ७२ कोटीच्या ९ मजली नवीन इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे.
फास्ट, परफेक्ट आणि गॅरंटेड काम फक्त दादाच करू शकता याची प्रचिती पुन्हा एकदा आली. एकाच वादा……
खरं तर मी कधीच राजकीय व्यक्ती किंवा पार्टी बाबत पोस्ट करत नाही, परंतु चांगले आणि तत्पर काम दादांनी केल्यामुळे त्यांचे जाहीर आभार मानणे क्रमप्राप्त आहे.. अजितदादा बारामती वकील संघटना आपली मनापासून आभारी आहे, ऋणी आहे.
आपला नम्र
अध्यक्ष व कार्यकारणी
बारामती वकील संघटना