वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारच : पांडुरंग मारकड
प्रसारमाध्यमांसमोर दिली माहिती
वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणारच : पांडुरंग मारकड
प्रसारमाध्यमांसमोर दिली माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेसाठी वडापुरी माळवाडी गटातून निवडणूक लढवणार असून त्यासाठी पूर्वतयारी केली असल्याचे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पांडुरंग मारकड म्हणाले की,गेली तीस वर्ष इंदापूर तालुक्यातील राजकीय व सामाजिक जीवनात सक्रिय असून सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे अन्यायाविरोधात खंबीरपणे उभा राहिलो आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार केला जाईल याचा मला विश्वास आहे.
पांडुरंग मारकड हे इंदापूर तालुक्यातील ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९९६ ते २००२ पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद भूषविले आहे. यापूर्वी त्यांनी २००२ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. परंतु अल्प मताने त्यांचा पराभव झाला.तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ही त्यांनी निवडणूक लढवली होती.
या नंतरच्या काळात राजकीय व सामाजिक जीवनात सक्रिय राहत मारकड यांनी राजकीय,सामाजिक व कुस्ती क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. परिसरातील युवकांचा त्यांना वाढता पाठिंबा असून आगामी काळात निवडणूक लढविण्यावार ते ठाम आहेत.
नुकत्याच झालेल्या सानेगुरुजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय खेचून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.सोसायटीच्या चेअरमनपदी त्यांचे बंधू तुळशीराम ज्ञानदेव मारकड विराजमान आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पांडुरंग मारकड हे खुल्या गटातून निवडणूक लढविणार आहेत. माळवाडी-वडापुरी गट महिलांसाठी राखीव झाल्यास त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.