वन्यजीव सप्ताह निमित्त पर्यावरण रक्षक संस्थांचा सन्मान

वन्यजीव सप्ताह निमित्त पर्यावरण रक्षक संस्थांचा सन्मान
बारामती वार्तापत्र
दि. १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. त्या निमित्त वनपरिक्षेत्र बारामती (प्रा) येथील वनक्षेत्रामध्ये ऐन उन्हाळ्यात कृत्रिम तलावामध्ये वन्यप्राण्यासाठी पाण्याचे दुर्भिक्ष असताना वन्यजीवासाठी पाणीपुरवठा करण्याचे काम विविध सेवाभावी संस्था यांनी स्वयंस्फूर्तीने केले.
या मध्ये लीनेस क्लब, एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया,चंदूकाका सराफ, पिंपळी ग्रामपंचायत यांचा समावेश असून,वन विभागात वन्यजीव साठी पाणवठे तयार करणे, टँकर ने पाणी पुरवठा करणे, वृक्षारोपण करणे , मानवी वस्तीत आलेल्या वन्यजीव यांचे संरक्षण साठी वन विभागास मदत करणे आदी कामांचा समावेश आहे.
त्या संस्था व पदाधिकारी यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल वन्यजीव सप्ताहाचे निमित्त साधून पुणे विभाग उपवनसंरक्षक महादेव मोहिते,सहाय्यक वनसंरक्षक पुणे अतुल जैनक यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले. या प्रसंगी पिंपळी ग्रामपंचायत सरपंच स्वाती ढवाण,उद्योजक चकोर शहा, सुभाष चौधर, अशोक ढवाण व फोरम,लीनेस क्लब चे सदस्य उपस्तीत होते वन विभाग बारामती च्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती. अश्विनी शिंदे, वनपाल संतोष उंडे, शितल बागल ,एस.आर. शेख, वनसंरक्षक बाळासाहेब गोलांडे, दयानंद अवघडे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.