इंदापूर

वन्यप्राण्यांच्या अधिवासास धोका ; वाहनांची वन विभागातून बेकायदेशीर वाहतूक

▫️वनमंत्री असणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी गप्प का?▫️

वन्यप्राण्यांच्या अधिवासास धोका ; वाहनांची वन विभागातून बेकायदेशीर वाहतूक

▫️वनमंत्री असणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी गप्प का?▫️

▫️सामाजिक कार्यकर्ते शेखर काटेंचा आंदोलनाचा इशारा▫️

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी,शेळगाव, कळस हद्दीतील वनविभागाच्या हद्दीतून बेकायदेशीर व अनधिकृत होत असलेली वाहतूक तात्काळ थांबवून वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेखर बयाजी काटे यांनी केली असून याबाबतचे निवेदन इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना दिले आहे.

सदरील गावांच्या वनविभागाच्या जागेतून मुरूम,खडी व इतर वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.त्यामुळे अनेकदा प्राण्यांचा जीव गेला आहे.तसेच वनविभागाच्या जमिनीच्या बाजूला खडी क्रशर देखील चालू आहे.त्यामुळे पशुपक्षी व प्राण्यांना त्रास होत असून त्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे.प्राणी मनुष्य वस्तीत भटकंती करीत आहेत.सदरील होत असलेली वाहतूक वन अधिनियम १९२७ व वन संवर्धन कायदा १९८० नुसार होऊ शकत नाही.वन अधिकारी कार्यालयात संपर्क केला असता ते प्रतिसाद देत नाहीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदरील वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसे न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा शेखर काटे यांनी दिला आहे.तसेच सदरील अधिकाऱ्यावर ही कारवाईची मागणी केली आहे.या संदर्भात तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मागील एक दोन आठवड्यात इंदापूर तालुक्यात हरीण जखमी अथवा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.त्यामुळे अशा वनविभागातील बेकायदेशीर वाहतुकीमुळेच प्राण्यांची भटकंती होत असल्याने असे अपघात घडत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. वन मंत्री असणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी अजूनपर्यंत गप्प का?असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला असून मंत्री दत्तात्रय भरणे अधिकाऱ्यांना या बेकायदा वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश देतील का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram