वरकुटे खुर्द येथून दोन शेळ्या व बोकडांची चोरी
दोन शेळ्या आणि तीन बोकडांची चोरी

वरकुटे खुर्द येथून दोन शेळ्या व बोकडांची चोरी
दोन शेळ्या आणि तीन बोकडांची चोरी
इंदापूर प्रतिनिधी –
वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथील एका शेतकऱ्याच्या दारातून दोन शेळ्या आणि तीन बोकडांची चोरी झाली. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ नवनाथ ठवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि.6) रात्री त्यांच्या गुरांच्या गोठ्यातून 10 हजार रुपये किमतीच्या दोन शेळ्या व 15 हजार रुपये किमतीचे तीन बोकड चोरी झाले.