शैक्षणिक

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू

300 पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू

300 पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित

पुणे; प्रतिनिधि

महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभरासह पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे उत्साहात सुरू आहे.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी 300 पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित राहून हे प्रशिक्षण घेत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, अध्यापनाची नवीन कौशल्य, अध्ययन क्षमता व बालकाच्या सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शैक्षणिक संशोधन, शालेय संस्कृती, मूल समजून घेताना, ताण तणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापनाच्या पद्धती, नवीन आव्हाने पेलताना, भारतीय ज्ञान प्रणाली, शालेय नियोजन, वर्ग निरीक्षण, व्यवसाय शिक्षण अशा अनेक विषयावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणीसाठी पहिल्यांदाच असे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलांचा सर्वांगीण विकास, पर्यावरण शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण कसे राबवावे याबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर अध्यापन पद्धती आणि मुलांचे अध्ययन यामध्ये मोठा सकारात्मक फरक दिसेल. हे प्रशिक्षण 2 जून ते 12 जून या कालावधीत पूर्ण होणार आहे.

” शिक्षकांना संवाद कौशल्य, व्यवसाय मार्गदर्शन, शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत व सायबर सुरक्षा व एकविसाव्या शतकातील कौशल्य याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांचे सक्षमीकरण होऊन विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणादरम्यान अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिक्षकांना लाभत आहे.”
-प्रा. पंढरीनाथ जाधव अधिव्याख्याता, डाएट
समन्वयक, निवड श्रेणी प्रशिक्षण इंग्लिश स्कूल रमण बाग.

या प्रशिक्षण वर्गाला डॉ. भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, पुणे जिल्हा परिषद पुणे, तसेच डॉ. नामदेव शेंडकर प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व डॉ. प्रभाकर क्षीरसागर वरिष्ठ अधिव्याख्याता, डाएट पुणे
या मान्यवर अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच प्रशिक्षणाच्या व्यवस्थेसाठी श्री. विक्रम मोरे सर आणि श्री. विनोद पारे सर यांनी कष्ट घेतले.

या निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. अशोक ढोले, प्रा. क्षितिजा दोशी, प्रा. कादंबिनी पाटील अशा अनेक तज्ञ मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन केले जात आहे.

Related Articles

Back to top button