वर्धमान विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी ऐंशी लाखांचा निधी राज्यमंत्री भरणेंकडून मंजूर
तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना

वर्धमान विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी ऐंशी लाखांचा निधी राज्यमंत्री भरणेंकडून मंजूर
तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना
इंदापूर : प्रतिनिधी
वालचंदनगर येथील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते शनिवारी (दि.४) संपन्न झाला. याप्रसंगी विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी ऐंशी लाखाचा निधी मंजूर करत असल्याचे जाहीर करून तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना मंत्री भरणेंनी दिल्या.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकवणारे विद्यार्थी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली ऋचा मकरंद वाघ व पुणे विभागीय बोर्डात मुलींमध्ये प्रथम आलेली उत्कर्षा योगेश शिंदे व अनुष्का संजय गायकवाड या विद्यार्थिनींना यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना त्यांचे समवेत फोटो काढण्याचा आग्रह धरला असता मंत्री महोदयांनी देखील तात्काळ विद्यार्थ्यांसमवेत जमिनीवर बसून फोटो काढत विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण केली.
यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीजचे वरिष्ठ व्यवस्थापक धीरज केसकर,शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे, प्राचार्य हनुमंत कुंभार,उपप्राचार्य अरुण निकम,उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पालक आदी उपस्थित होते.