वाईची फिनिशिंग गर्ल राॅयल कोयना बनली श्वान स्पर्धेची विजेती
आकर्षक चषक बक्षीस देण्यात आला.
वाईची फिनिशिंग गर्ल राॅयल कोयना बनली श्वान स्पर्धेची विजेती
आकर्षक चषक बक्षीस देण्यात आला.
बारामती वार्तापत्र
रेसिंग क्लब ऑफ महाराष्ट्र वाई तालुक्यातील चॅम्पियन फिनिश गर्ल्स ऊर्फ रॉयल कोयना या श्वानाने मानाचा क्रांतिवीर लहुजी साळवे चषक जिंकून डोळ्याचे पारणे फेडले. श्वान स्पर्धेत राज्यातील नामवंत श्वानांनी सहभाग घेतला होता.
सुनिल खिलारे यांनी कै.विकास प्रताप सातपुते यांच्या स्मरणार्थ क्रांतिवीर लहुजी साळवे चषक श्वान (धावण्याची)स्पर्धा माळेगाव येथे आयोजित केली होती. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून अॅड.राहुल तावरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी निवृत्त वनाधिकारी शामराव सातपुते, उद्योजक सुयोग सातपुते, रोहित सातपुते,कुलदिप तावरे, शौकत शेख, प्रताप सातपुते, वसंतराव पैठणकर,बाबा घोडके आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सुत्रसंचलन प्रकाश महागावकर यांनी केले.
या स्पर्धेत राज्यातील नामवंत श्वानांनी सहभाग घेतला होता.विजेत्या पाच श्वान स्पर्धेकाना रोख रक्कम व आकर्षक चषक बक्षीस देण्यात आला.
या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक- महाराष्ट्र रेसिंग क्लब वाई तालुका चॅम्पियन फिनिश गर्ल्स ऊर्फ रॉयल कोयना, द्वितीय क्रमांक-बादल रेसिंग क्लब करमाळा- वरदान, तृतीय क्रमांक-ऋतुराज काळे बारामती ज्युनिअर जॅकली, चतुर्थ क्रमांक- पै.मंगेश जाधव मंगळवेढा ज्युनिअर गोटे,पाचवा क्रमांक- सेवागिरी प्रसन्न पुसेगाव राजधानी २०६९