वाईन विक्री बाबतचा निर्णय राज्य शासनाने त्वरित मागे घ्यावा :- रिपब्लिकन पक्षाची मागणी..
कुटुंबांची भविष्यात होणारी वाताहत थांबवावी
वाईन विक्री बाबतचा निर्णय राज्य शासनाने त्वरित मागे घ्यावा :- रिपब्लिकन पक्षाची मागणी..
कुटुंबांची भविष्यात होणारी वाताहत थांबवावी
बारामती वार्तापत्र
वाईन ही सुपर मार्केट मध्ये एक हजार स्क्वेअर फूटा पर्यंतच्या दुकानात उपलब्ध करून देण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शासनाच्या धोरणाचा निषेध करीत,सदर निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन होतील असा इशारा देखील देण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीमती रत्नप्रभा साबळे व महिला शहराध्यक्षा पुनम घाडगे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सदरील मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सचिव सुनील शिंदे,तालुका सरचिटणीस संजय वाघमारे,निलेश जाधव,गणेश जगताप,रजनी साळवे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाईन विक्रीतून सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होईल असा चुकीचा युक्तिवाद शासनाच्या वतीने होत असून प्रत्यक्षात गरीब शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील तरुण मुले, कुटुंबातील कर्ते कुटुंब प्रमुख हे वाईन सहज रित्या उपलब्ध झाल्याने त्याच्या आहारी जाऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा त्यातून जास्त धोका असल्याने सदरील आत्मघातकी निर्णय शासनाने त्वरित मागे घेऊन महिला वर्गांना न्याय द्यावा व कुटुंबांची भविष्यात होणारी वाताहत थांबवावी असेही सदरील निवेदनात म्हटले आहे.
सदरील राज्य शासनाच्या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रात यासंबंधीचे आंदोलन सुरू असून शासनाने जनभावना विचारात घेऊन व राज्याची सांस्कृतिक व सामाजिक होणारी अधोगती रोखण्यात प्रयत्न करावा अन्यथा होणाऱ्या परिणामाचे दुष्परिणाम व पाप हे शासनाला भोगावे लागेल. तसेच अशाप्रकारच्या आत्मघातकी निर्णय मागे घेणार नसेल तर हातभट्टी दारू लाही परवानगी द्यावी असेही जिल्हा सचिव सुनील शिंदे यांनी बोलताना सांगितले