वागण्यात शिथीलता येऊ देऊ नका. हे संकट जगावरचे सर्वात महाभयानक संकट – मुख्यमंत्री.
आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनसंवाद साधला
वागण्यात शिथीलता येऊ देऊ नका. हे संकट जगावरचे सर्वात महाभयानक संकट – मुख्यमंत्री.
आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनसंवाद साधला.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
वागण्यात शिथीलता येऊ देऊ नका. हे संकट जगावरचे सर्वात महाभयानक संकट असणार आहे. हे संकट शेवटचे असेल असेच नाही, यापुढील काळातही संकटे येतील अशी भीती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात व्यक्त केली.
आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनसंवाद साधला. यावेळी अनेक विषयांना मुख्यमंत्र्यांनी हात घातला. शिवभोजनच्या माध्यमातून पावणेदोन कोटी थाळ्यांचे वितरण झाल्याचा, लहान मुलांना दुधभुकटी सुरू केल्याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्रात तीन लाख बेड वाढविण्यात यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न होतोय उपस्थितीला वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे. युष्य पूर्वपदावर आणताना सणावाराचे दिवस, पावसाळा आहे. कोरोनाचे संकट गेलेच नाही, उलट ते वाढतच आहे. जगामध्ये दुसरी लाट आली असल्याचे भीतीदायक चित्र आहे. मुंबईत १ हजाराच्या आसपास रोखून धरलेली कोरोना रुग्णांची संख्या आता दोन हजारांवर पोचली आहे. सर्वजण सामाजिक भान ठेवून काम करीत आहेत. कोरोनाचे संकट आता पुन्हा आक्राळविक्राळ रुप धारण करेल अशी चिन्हे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही ही भीती व्यक्त केली आहे. खबरदारी व जबाबदारीचे वाटप आपण करू या. आम्ही काही गोष्टींची खबरदारी व जबाबदारी घेऊ. काही जबाबदारी व खबरदारी तुम्ही घ्यावी. मी १५ तारखेपासून मोहिम राबविण्याचे जाहीर केले आहे. माझे कुटुंब – माझी जबाबदारी ही ती मोहिम आहे, यात सर्वांनी सहभागी व्हावे. हे महाराष्ट्र माझे कुटुंब आहे, त्याला सुरक्षित ठेवण्याची माझी जबाबदारी आहे. हे प्रत्येक महाराष्ट्रप्रेमींनी लक्षात घ्यावे.
राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे, सर्वांची तपासणी अशक्यप्राय आहे. मात्र यात प्रशासनाकडून प्रत्येक घरात महिन्यातून दोन वेळा आरोग्याची चौकशी करण्यासाठी सरकारची पथके जातील. आमदार, खासदार, नगरसेवक, सदस्यांनी आपालल्या वॉर्डाची जबाबदारी घ्यावी. घराघरात जाऊन विचारपूस करावी. ५०-५५ पेक्षा अधिक वयाचे कोण आहेत, त्यांना सहव्याधी आहे काय याची माहिती आरोग्य प्रतिनिधींना द्यावी. मुंबईत चेस द व्हायरस म्हणजे व्हायरस पोचण्यापूर्वीच लोकांपर्यंत पोचून त्यांना आवश्यक सुविधा देण्याची मोहिम आहे. तशीच लोकप्रतिनिधींनी जर ही जबाबदारी घेतली, तर बरेच काही साध्य होईल. ज्या कुटुंबातील लोक बाहेर जातात, त्यांनी बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, घरी येताच बूट, चपला घालून आत येऊ नका. कपडे धुवायला टाका. आंघोळ करा. रस्त्यावर थुंकू नका. लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर ठेवा. इतर व्यक्तींशी बोलताना समोरासमोर बोलण्याचे टाळा. ऑनलाईन खरेदीवर जरा भर द्यावा लागेल. दुकानातील सॅम्पलच्या वस्तूंना कारण नसताना हात लावू नका. शहरी भागात घरांमध्ये चौथरे नाहीत. भेटायचे असेल तर बंद जागेत शक्यतो भेटू नका. खिडक्या मोकळ्या ठेवा. अडचणीच्या जागी जास्त थांबू नका. प्रत्येकांनी या साऱ्या मोहिमेत आपापल्या परीने वाटा उचलावा. हे युध्दच आहे. जनता जेव्हा रस्त्यावर उतरते, तेव्हा हे युध्द जिंकता येते. मास्क हनुवटीजवळ ठेवू नका. एकटे धावताना मात्र मास्क घालू नका.
मुख्यमंत्री म्हणाले, जगातील इतर देशात वातावरण मोकळे केले आहे. मात्र कायदे कडक केेले आहेत. महाारष्ट्रात आपली जबाबदारी आपली आपण पार पाडू शकत नाही का? आता यापुढील काळात गर्दी होणार असेल, मास्क घातले जाणार नसतील, तर कायदे वापरावेच लागतील. वागण्यात शिथीलता येऊ देऊ नका. हे संकट जगावरचे सर्वात महाभयानक संकट असणार आहे. हे संकट शेवटचे असेल असेच नाही, यापुढील काळातही संकटे येतील.