वाढदिवसाचे औचित्य साधून, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

वाढदिवसाचे औचित्य साधून, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
इंदापूर;प्रतिनिधि
वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रतीक देवकाते पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळा या ठिकाणी आश्रमा मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
मंगळवार (दि.15) जुलै रोजी प्रतीक देवकाते पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहरातील मूकबधिर शाळेतील 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
त्यामध्ये वही,पेन,पेन्सिल व खाऊचे वाटप केले.
यावेळी प्रितेश भरणे, ॲड. अविनाश गवळी,प्रदीप रूपनवर,सागर पवार,विवेक नरुटे, तुषार मारकड, सुहास कारंडे, करण जाधव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी जिज्ञासा,धैर्य, एकाग्रता,संयमाने यश संपादन करावे – युवानेते प्रितेश भरणे
विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे.स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चित यश प्राप्त होईल. घर व परिसर आपला स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहावे. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे. स्वच्छतेचे आणि व्यसनमुक्तीचे दूत म्हणून विद्यार्थ्यांनी समाजाच्या हितासाठी काम करावे असेही युवानेते प्रितेश भरणे यांनी यावेळी सांगितले.