वाढीव वीज बिले न भरल्यास, कनेक्शन कट करण्याची धमकी, म्हणजे शासनाची हुकूमशाहीच- संभाजी ब्रिगेड
पेट्रोल, डिझेल ,गॅस चे दर कमी करण्याची मागणी
वाढीव वीज बिले न भरल्यास, कनेक्शन कट करण्याची धमकी, म्हणजे शासनाची हुकूमशाहीच- संभाजी ब्रिगेड
पेट्रोल, डिझेल ,गॅस चे दर कमी करण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
गेल्यावर्षी मार्चपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता अनेक वेळा लॉक डाऊन करण्यात आले होते.तसेच अनेक अटी व मर्यादा घालून व्यवहार चालू होते. त्यामुळे मध्यमवर्गीय ,व्यापारी ,कामगार, शेतकरी या सर्वांना आतोनात त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापार, दुकाने सर्व बंद झाले होते त्यामुळे आर्थिक झळ बसली मात्र या दरम्यानच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यातील जनतेला भरमसाठ वाढिव बिले पाठवली.
या विषयी संभाजी ब्रिगेड सह अनेक पक्ष ,संघटनांनी आवाज उठवला होता. तेव्हा आघाडी सरकारचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू किंवा कमी करू असे आश्वासन दिले होते. मात्र आता शासनाने थकीत बिले न भरल्यास वीज कनेक्शन कट करण्याची धमकी दिली आहे. तसे नोटीसही पाठवले आहे हा सर्व प्रकार म्हणजे शासनाची मुस्कटदाबी व हुकूमशाही चा प्रकार आहे.
त्यामुळे सर्व ग्राहकांचे वाढीव वीज बिले तात्काळ माफ करावे तसेच पेट्रोल, डिझेल व गॅस चे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.
त्यामुळे याविषयी आपण निर्णय घेऊन वाढलेले दर कमी करावे व वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत या मागणीचे निवेदन आज संभाजी ब्रिगेडच्या बारामती तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप, बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे ,तालुका सरचिटणीस ऋषिकेश निकम, तालुका संघटक विशाल भगत ,सिद्धार्थ जगताप, आदेश तुपे ,यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.