इंदापूर

वाळू चोरांना वालचंदनगर पोलिसांचा दणका,, कारवाईत 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

पथकाने दि. 02/03/2021 रोजी पहाटे 03/00 वा. चिखली व लासुर्णे या ठिकाणी छापे टाकले असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाळू चोरांना वालचंदनगर पोलिसांचा दणका,, कारवाईत 27 लाखांचा मुद्देमाल जप्त

पथकाने दि. 02/03/2021 रोजी पहाटे 03/00 वा. चिखली व लासुर्णे या ठिकाणी छापे टाकले असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बारामती वार्तापत्र
पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कोठेही चोरुन वाळु ची विक्री होणार नाही याबाबत मा. श्री डॉ. अभिनव देशमुख सो. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी मार्गदर्शनपर सुचना देवुन आदेशित केले होते. त्याप्रमाणे श्री दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन यांनी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या.

वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे चिखली ता. इंदापुर जि. पुणे या गावचे हद्दीत निरा नदीच्या काठावर तसेच मौजे लासुर्णे गावचे हद्दीतुन चिखली फाटा येथुन चोरून वाळु उपसा होत असलेबाबत ची गोपणीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार वालचंदनगर पोलीस स्टेशन यांना मिळाली होती त्यांनी सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पो.हवा. माने 833, पो.काँ. जगताप 2883, पो.काँ. खुळे 269, चालक पो.ना. नावडकर 1258 यांना सदर वाळु चोरीबाबत माहिती देवुन त्यांना कारवाई करणेबाबत सांगितले होते. वरील पथकाने दि. 02/03/2021 रोजी पहाटे 03/00 वा. चिखली व लासुर्णे या ठिकाणी छापे टाकले असता खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१)३,१५,०००/- दोन निळ्या रंगाचे ट्रॉल्या त्यावर नंबर नसलेल्या त्यामध्ये एकूण ३ ब्रास वाळू प्रत्येक ट्रॉलीमध्ये दीड ब्रास वाळू

२) ६०५०००/- एक टाटा योद्धा पांढऱ्या रंगाचा मालवाहतूक टेम्पो त्याचा नंबर एम एच ४२ ए डी ६९३८ असा असलेला त्यामध्ये १ ब्रास वाळू मिळून

३)६,०००००/- एक न्यू हॉलंड कंपनीचा ३६३० मॉडेलचा ट्रॅक्टर त्यावर नंबर नसलेला त्याचा चासिस नंबर NHN36300ZLG511062 असा असलेला इंजिन नंबर 289872DX असा असलेला.

४) ३,०५,०००/- दोन लाल-पिवळ्या रंगाच्या ट्रॉल्या त्यावर नंबर नसलेल्या जु वा कि अं. त्यापैकी एका ट्रॉलीमध्ये दिड ब्रास वाळू व एक ट्रॉली मोकळी.

५) ६०००००/- एक न्यू हॉलंड कंपनीचा ३६०० मॉडेलचा ट्रॅक्टर त्यावर नंबर नसलेला त्याचा चासिस नंबर NHN36000ZHH3987038 असा असलेला इंजिन नंबर 212034DX असा असलेला.

७) ३०००००/- दोन लाल-पिवळ्या रंगाच्या ट्रॉल्या त्यावर नंबर नसलेल्या असा एकूण- २७,२५०००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदबाबत १) उमाजी मारुती खोमणे रा. लासुर्णे, चिखली फाटा ता. इंदापुर जि.पुणे २) अंकुश रामचंद्र जोगदंड रा. सणसर तालुका -इंदापूर जिल्हा- पुणे व अज्ञात ३ वाहनाचे चालक किंवा मालक. यांचेवर वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ८२/२०२१भा.द.वि.क. ३७९,४३९,३४ पर्यावरण अधिनियम कलम ३,५ सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कलम ४, गौन खानिज कायदा कलम ३ गुन्हा दाखल करण्याता आलेला असुन सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. डाँ. श्री अभिनव देशमुख सो. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री मिलीद मोहिते सो. पोलीस अधिक्षक बारामती पुणे ग्रामीण, मा. श्री नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली श्री.दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, पो.हवा. माने 833, पो.काँ. जगताप 2883, पो.काँ. खुळे 269, चालक पो.ना. नावडकर 1258 यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button